शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी दिनांक १० मार्च २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे उत्तमराव फुटाणे व ग्रामपंचायत सदस्या सौ. लताबाई पवार यांच्या हस्ते पूजन करून मालार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक पांडुरंग बोडे, सुनील आसुटकर, डॉ. संजय पवार, बंडूजी नरांजे, विलास हरबडे, मधुकर बोढे, अजय वनकर, विशाल राऊत, अनिकेत ताजने, प्रमोद राऊत, बालू महाजन, प्रमोद पांगुळ, दीपक महाजन, अतुल जवादे, राजू रोंगे, भोला खापरकर, गणेश सरोदे, संजय बलांद्रे, मधुकर कातकर, राजु धांदे हे उपस्थित होते.