बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

दिनांक ४ / ३ / २०२३ रोजी शनिवारला बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका तालुका राळेगाव येथे स्व. बापुसाहेब देशमुख तथा स्व. सौ. ज्योतीताई देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ बापुसाहेब देशमुख विद्यालय जळका व दत्त हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणुन प्रकाशराव देशमुख अध्यक्ष गोविंद ग्रामीण शिक्षण संस्था जळका हे होते, प्रमुख अतिथी म्हणून दत्त हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधिर देशपांडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून मंदारराव देशमुख सचिव गोविंद ग्रामीण शिक्षण संस्था जळका तथा उपसरपंच ग्रामपंचायत जळका, अनिल इटेकर मुख्याध्यापक, रमेशराव कुळकर्णी, प्रमोदराव थोडगे, गजाननराव कुळकर्णी, शुभम कुळकर्णी आदी उपस्थित होते. डॉ रजत दलाल एम.डी. मेडीसीन, डॉ. आशिष लढ़ें, स्त्री रोग तज्ञ डॉ सुने मॅडम या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले, परीचारिका निलिमा मॅडम, मयुरी मॅडम फार्मसीस्ट श्यामराव, अखिलेश व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात १०० च्या जवळपास रुग्णांनी लाभ घेतला. शिबीराच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक, प्रवीण निमट, विनोद सातारकर, निलेश कोल्हे, संजिव मडावी, मधुकर परचाके, शिक्षकेत्तर कर्मचारी विलास खेडेकर, विठ्ठल झाडे, गणेश गाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन शिक्षक शंकर मोहुर्ले यांनी केले.