हवामान अंदाज विषयी श्री गजानन जाधव साहेब यांचे मार्गदर्शन

उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तूळसिराम राठोड (ग्रामीण )

💥हवामान अंदाज 💥
या आठवड्यात सुद्धा राज्यात पूर्णपणे स्थिर हवामान अपेक्षित नाही, संपूर्ण आठवडा बऱ्याच भागात दुपार नंतरचे आभाळी हवामान राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे कमाल तापमानात वाढीस ब्रेक लागेल व तसेच तापमान राहील तसेच काही भागात पडणारा पाऊस हा दुपार नंतरचा विखुरलेला वादळी राहील, त्यात हि दिवसानुसार जास्त शक्यता अशी सोमवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र्र व दक्षिण मराठवाडा मंगळवारी या भागासह मध्य महाराष्ट्र्र बुधवारी क्ष्रेत्रात वाढ होऊन पश्चिम विदर्भ, खान्देश, मराठवाडा तसेच बुधवारी या आठवड्यातली जास्त गारपीट होण्याची शक्यता आहे गुरुवारी सुद्धा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, गुरवार शुक्रवार व शनिवार पूर्व विदर्भात जास्त शक्यता आहे व इतर जागी सुद्धा विखुरलेला पाऊस पडेल या आठवड्यात खराब वातावरण जास्त दिवस व विखुरलेले असल्याने महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात वादळी पावसाची शक्यता आहे. असे मार्गदर्शक श्री गजानन जाधव साहेब यांनी सांगितलेलं आहे