विभागीय रोलर स्केटिंग स्पर्धेत ईश्वरी फुकट ची निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालय वर्धा यांचे विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत ईश्वरी शरद फुकट या मुलीने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावत मनाचे स्थान प्राप्त केले आहे
डौलापूर येथील शेतकरी कुटुंबातील शरद फुकट यांची कन्या हिंगणघाट येथील सेंट जॉन हायस्कूल येथे स्टॅंडर्ड चार मध्ये शिकत असून ईश्वरी फुकट हिने स्कूल ऑफ स्कॉलर वर्धा येथे घेण्यात आलेला जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत भाग घेऊन ती जिल्हास्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावित घवघवीत यश प्राप्त केले असून ईश्वरी फुकट याची निवड विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत करण्यात आली असून ती आपल्या यशाचे श्रेय सेंट जॉन हायस्कूल येथील शिक्षक तसेच आई-वडील यांना दिले आहे