डॉ. य. मो. दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्ट च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सोनामाता हायस्कूल चहांद शैक्षणिक सहलीचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

6 जानेवारी 2024
शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये 50 विद्यार्थी व पाच शिक्षक शिक्षक यांनी सहभाग घेतला. ही सहल 6 जानेवारीला पहाटे5:00 वाजता शाळेच्या पटांगणावरून निघाली. एसटी महामंडळात च्या बसने ड्रायव्हर सतीश भगत यांनी सहकार्य केले. सहल प्रथम यवतमाळ मार्गे नांदेड येथे पोहोचली. त्या ठिकाणी गुरुगोविंद सिंग यांच्या गुरुद्वारेचे दर्शन घेतले. तेथील महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर सहल तुळजापूर येथे पोहोचली. तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन घेतले. तेथून सहल कोल्हापूरला पोहोचली. तिथे राजर्षि शाहू महाराज यांच्या राजवाडा तसेच लक्ष्मी माता मंदिर यांचे दर्शन घेतले. ऐतिहासिक अशा पन्हाळगळाला भेट दिली. तेथून सहलीचा पुढचा टप्पा पंढरपूर होता. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर सहल जेजुरीला रवाना झाली. दुसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर सहल कोकणात दाखल झाली. विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेतला मजा लुटली. गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन सहल परतीच्या प्रवासाला निघाली. वाटेत येताना ऐतिहासिक अशा औरंगाबाद येथील बीबी का मकबरा, वेरूळ येथील बौद्ध लेणी तसेच सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ मा साहेब स्थळाला भेट दिली. तिथून सहल सुखरूप शाळेत परत आली. या सहली ला यशस्वी करण्यासाठी माननीय शिवणकर सर, चिव्हाणेा सर ,दांडेकर सर ,गावंडे मॅडम , सावंत सर या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रेक्षणीय स्थळे व धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांबद्दलची माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थी आनंदात होते. अशा प्रकारे सोनामाता हायस्कूलची शैक्षणिक सहल अतिशय उत्साहात आनंदात प्रफुल्लित वातावरणात यशस्वीपणे पार पडली. या सहलीला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे पालक व इतर गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले.
ही सहल डॉ. वीरा पवन मांडवकर, उपाध्यक्ष ,मा.डॉ. श्री पवन भाऊसाहेब मांडवकर सहसचिव, यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. सहलीचे आयोजन केल्याबद्दल व सहल यशस्वी केल्याबद्दल यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अनिल धोबे सर यांनी या सहलीसाठी प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. विद्यार्थी सुखरूप परत आल्याबद्दल सहभागी शिक्षकांचे कौतुक व आभार मानले. गावातील पालक हे सुद्धा इतक्या कमी खर्चात सहल नेल्यामुळे आनंदी होते. विद्यार्थ्यांना धार्मिक ऐतिहासिक स्थळे बघायला मिळाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते.