
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 10/6/2022ला विद्यमान उपविभागीय अधिकारी साहेबामार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती तसेच प्रधानमंत्री महोदय याना निवेदन देण्यात आले. तसेच राळेगाव पोलिस स्टेशन चे विद्यमान पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देऊन नूपुर शर्मा व नवीन जिंदल यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.ईस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या बद्दल बीजेपी या पक्षाचे तत्कालीन सदस्य तथा राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा रा.नवी दिल्ली तथा नविन जिंदल यांनी अतिशय अवमानकारक व भारतीय संस्कृतीस अशोभनिय भाषा वापरली आहे व मोहम्मद पैगंबर साहेबांचा अपमान केला आहे. ईस्लाम धर्मात अल्लाह नंतर मोहम्मद पैगंबर साहेब यांना जो मान आहे तो ईतर कोणालाही नाही. यामुळे केवळ देशातीलच नाही तर संपुर्ण जगातील मुस्लीम समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आम्हा सर्व निवेदन कर्त्यांचे धार्मीक भावना तिव्र प्रकारे दुःखावले आहे. ईस्लाम धर्म हा शांततेचा पुरस्कर्ता आहे ईतकेच नव्हेतर ईस्लाम या अरबी शब्दाचे अर्थच शांती असा होतो. परंतु मोहम्मद पैगंबर (स.अ.स.) यांच्या बद्दल अपमानकरणारी भाषा ईस्लाम धर्माचे अनुयायी म्हणुन कोणताच मुसलमान कदापीही सहन करु शकत नाही याची चांगल्याप्रकारे जाणीव असुन सुद्धा जाणीवपुर्वक देशातील शांतता भंग करुन धर्मा – धर्मा मध्ये वाद निर्माण करुन दंगे भडकवीण्याचा कुप्रयत्न वरील समाजकंटक नुपुर शर्मा व नविन जिंदल यांनी केले आहे. सबब नुपुर शर्मा रा.दिल्ली व नविन जिंदल यांचेवर कठोरातकठोर कायदेशीर कारवाई करुन आम्हाला न्याय द्यावा अश्या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले यावेळी राळेगाव मधील सर्व मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.
