डॉ. मनमोहन सिंग यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

सहसंपादक : रामभाऊ भोयर

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांना बापू फाउंडेशन राळेगाव च्या वतीने येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापू फाउंडेशनचे सचिव सुरेंद्र ताठे हे होते . श्रद्धांजली कार्यक्रमात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विविध घटना याप्रसंगी सांगण्यात आल्या यावेळी माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूपेंद्र कारीया वकील संघाचे अध्यक्ष अॅड प्रफुल्लसिंह चौहान प्राध्यापक गजानन घुंगरूड किशोर मांडवकर नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी शरचंद्र पवार गट चे दिलीप कन्नाके माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद तामगाडगे शिवसेना उभाटा गटाचे शंकर गायधने यांनी विचार व्यक्त केले यानंतर सर्वपक्षीय मौन श्रद्धांजली देण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे संचालन एड वैभव पंडित यांनी केले