प्रतिभा प्राथमिक/माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


श्री संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जळका येथील प्रतिभा प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा येथील सहाय्यक शिक्षक विनोद फुकट यांच्याकडून वर्ग पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात आले आहे .
यावेळी स्वेटरचे वाटप पांढरकवडा येथील विस्तार अधिकारी पेंदोर यांच्या हस्ते दिं २१ डिसेंबर २०२२ रोज बुधवारला करण्यात आले असून यावेळी प्रतिभा शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक रमेश चव्हाण,माध्यमिक मुख्याध्यापक राजू रोहनकर शिक्षक अनिल गौरकर ,रविकांत जनेकर,विठ्ठल ठक , प्रफुल बोडाले, अधिक्षक मोहन खारकर,शिक्षिका माया परचाके,संगीता पवार,सविता केराम,
अधिक्षिका निशा सूर, लिपिक वंदना खापणे मॅडम ज्ञानेश्वर वाकडे,बाळू लोहकरे,तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
थंडीची चाहूल लागताच हुडहूडी भरायला लागणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शाळेतील गरीब असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी येथील सहाय्यक शिक्षक विनोद फुकट हे विद्यार्थ्यांना स्वखर्चाने स्वेटर वाटप करतात त्याचप्रमाणे याही वर्षी फुकट यांनी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप केले असून या थंडीच्या दिवसात आदिवासी बालकांना मायेची उब मिळाली शिवाय नव्या मिळालेल्या स्वेटर मुळे पालकांच्या चेहऱ्यावर समाधान तर बालकांचे मनात आनंद पसरला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.