
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील असंख्य गावांसह शहरातही बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट वाढला असून या बोगस डॉक्टरांकडून नागरिक उपचार करून घेत असल्याने हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असून या बोगस डॉक्टरांना अभय तरी कुणाचे असा प्रश्न नागरिक उपस्थित करताना दिसून येते.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून हवामानच्या बदलामुळे सर्दी डोकेदुखी अंगदुखी मलेरिया आदी प्रकारच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली असून या संधीचा फायदा घेत बोगस डॉक्टर मुन्नाभाईनी आपली दुकानदारी जोरात चालवली असून या मुन्नाभाईंनी नागरिकांच्या जीवाशी गोरख धंदा सुरू केला आहे तरी पण या मुन्नाभाई डॉक्टरवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसून तालुका आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या मुन्नाभाईंना सर्रास मेडिकल मधून विनासायास औषध मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे
मग कुठल्याही आरोग्य परवाना नसतानाही त्यांना औषधी मिळत असल्याच्या प्रकारचे आरोग्य विभागाला कुठली माहिती नाही मात्र चुकीचे उपचार झाल्यास रुग्णांना जीव गमवावा लागू नये यासाठी प्रशासनाने वेळेस दखल घेऊन डॉक्टर मुन्नाभाईचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.
