
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री. संत गजानन महाराज देवस्थान येथे जागतिक पारायण विजय ग्रंथ दिन साजरा करण्यात आला यामध्ये गावातील तसेंच बाहेर गावातील महिलां मंडळी तसेंच पुरुष मंडळी द्वारे श्री संत गजानन महाराज यांच्या विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आलेत.यामध्ये जवळपास 30 ते 40 महिलांनी सहभाग घेऊन हा दिन साजरा केला. यामध्ये च देवस्थान च्या वतीने उपस्थित सहभागी महिलांचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आलेत या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता गुलाबराव महाजन, पुरुषोत्तम कोपरकर, डॉ. ज्ञानेश्वर मुडे,कवडूजी कुबडे, दिवाकर पानसे, नारायण कुठे, शेखर रडके, गजानन एकोणकर,रुपेश रेंघे हर्षद कुबडे,निखिल भोयर, अमोल केवटे, कोरडे सर, योगेश कोटेकर, संजय थुटूरकर ई सहकार्य केले
शेवटी महाप्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
