डॉ अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व महिला सन्मान सोहळा

सहसंपादक :- रामभाऊ भोयर

 

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती व महिला सन्मान सोहळा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत ३१ मे रोजी संपन्न झाला सविस्तर वृत्त असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करून महिला व बालविकास विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने महिला मायाबाई अंकुश पंडिले, मिराबाई पंढरीनाथ करपते, वैशाली विवेक चौधरी, कल्याणी राजू पंडिले, गिरजा चंद्रभान जांभुळकर, कुमारी निशा अशोक लोणबले यांचा शाल श्रीपल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी गावातील प्रथम नागरिक सरपंच उमेश गौळकार तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर अशोक उईके, कुणाल भोयर भाजपा शहर अध्यक्ष राळेगाव, डॉक्टर भीमराव कोकरे, पोलीस पाटील ढगेश्वर मांदाडे, दीपक पवार, रामचंद्र आडते, अरविंद गाउत्रे, निखिल शेळके, चापले सर, हरिदास चामाटे, भानुदास आडे, शेख सर, केमेकार सर, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भाटाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू पंडिले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अरुण गाडगे, अरविंद वाघमारे, मयूर पंडिले, अरुण पंडिले, देवराव कोकरे, दामोधर कोकरे, आकाश पंडिले, काशीनाथ पंडीले, आनंद आडते, विकास पंडीले, सदाशिव लोंढे, रितेश पंडीले,वेदान्त पंडीले, मयुरी आडते,टिंनु पंडिले, रेश्मा पंडिले,तनू वाघमारे, प्रफुल पंडिले, हनुमान गाडगे, राजू पंडिले, चंद्रशेखर पंडिले, बंडू पंडिले, चंदू पंडिले, किशोर पंडिले, संतून वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.