
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ऑनलाईन सेवा केंद्र मधून नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे सर्व प्रकारचे दाखले प्रमाणपत्रासाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहेत आपले सरकार या पोर्टल द्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचे शुल्क वाढ करण्यात आले असून विविध प्रकारच्या दाखल्याच्या शुल्कात शासनाने दुप्पट वाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार आहे .
शाळा महाविद्यालय शासकीय योजना आदी महत्त्वाच्या बाबीसाठी नागरिक व विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रतिज्ञापत्र नान क्रिमिलेयर जात पडताळणी ,रहिवाशी आधी दाखल्यांची गरज भासते वरील दाखले, प्राप्त करण्यासाठी शासनाने सेतू केंद्राची निर्मिती केली आहे आता बारावीचा निकाल लागला असून काही दिवसात दहावीचा निकाल लागणार आहे .
निकाल लागल्यानंतर विविध ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दाखल्यांची गरज भासते यावेळी विद्यार्थी दाखले काढण्यासाठी सेतू केंद्रावर एकच गर्दी करतात मात्र त्यांना आता अधिकच्या शुल्क देऊन दाखले मिळवावे लागणार आहे आधी ३४ ते १०० रुपयापासून दाखले प्राप्त करण्यास शुल्क होते त्यामुळे नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढे शुल्क आकारले जात होते परंतु काही दिवसांपूर्वी प्रशासनाने दाखल्यांच्या शुल्कात वाढ केली आहे ६९रुपये ते १२८ रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे उत्पन्न नॉन क्रिमीलेअर व इतर दाखल्यांसाठी नागरिकांना ६९ रुपये तर जातीच्या प्रमाणपत्रासाठी १२८ रुपये मोजावे लागणार आहे.
या दाखल्यासाठी तर दुप्पट शुल्क आकारणी केल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या खिशाला चाप बसला आहे
गरीब विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री
शासकीय दाखल्यांसाठी सेतू केंद्रात प्रशासनाने नमूद करून केलेले शुल्क भरून अर्ज करावा लागतो गरीब विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाढीव शुल्क परवडणारे नाही परंतु आवश्यक दाखले मिळावेत यासाठी गरजूंना वाढीव शुल्क भरावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीचा भुर्दंड सोसावा लागतो
*सर्व सेतू केंद्र चालकाच्या खात्यातून वेगवेगळ्या दाखल्यांसाठी ६९ ते १२८ रुपयाची कपात प्रशासनाकडून केली जात आहे त्यामुळे साहजिकच आम्हाला ग्राहकाकडून प्रशासन वाढ केलेल्या शुल्काप्रमाणे प्रत्येक दाखल्यासाठी वाढीव शुल्क आकारावे लागत आहे.
सेतू केंद्र चालक
गणेश काळे,सचिन त्रिपदवार
राळेगाव
