बेंबळा कॅनॉलचे पाणी सोडण्याची राळेगाव तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

सध्या खरीप हंगाम संपून रब्बी हंगामास सुरुवात झाली असून रब्बी पिकाच्या पेरणीसाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे व बहुतेक शेतकऱ्यांचे ओलिताचे गणित हे बेंबळा कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आता हरभरा , गहू या पिकासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी मिळाले नाही तर विकास भरपूर नुकसान होऊ शकते. बहुतेक शेतकऱ्यांनी शेत नांगरणी करून ठेवले आहे. व आता त्यांना शेतात पाणी देऊन रोटावेटर मारून हरभरा व गहू या पिकाची लागवड करायची आहे. परंतु बेंबळा कॅनल प्रशासनाने अजून पर्यंत कॅनॉलला पाणी सोडले नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची लागवड लांबणीवर पडत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना बीज उगवण्यासाठी पाणी देण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातले बीज पेरणीसाठी व उगवणतेसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असून खरेदी परिसरात बऱ्याच शेतकऱ्याचे ओलतीचे गणित हे बेंबळा कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बेंबळा कॅनल प्रशासनाने लवकरात लवकर कॅनॉलमध्ये पाणी सोडावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या ओलतीचा प्रश्न सुटेल. तेव्हा बेंबळा कॅनल प्रशासनाने लवकरात लवकर कॅनलला पाणी सोडावे अशी राळेगाव तालुक्यातील परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.