आर. जी. एस. टी. सी. तर्फे संशोधन उपक्रमाला मान्यता

6

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव येथील स्वर्गीय चिंधुजी लक्ष्मण पुरके शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख . के. डी. जगताप यांचा “हाय एनर्जी सुपर कॅपॅसिटर” या विषयाशी संबंधित संशोधन उपक्रमाला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याद्वारे स्थापन केलेल्या आर जी एस टी सी प्रकल्प मूल्यमापन समितीच्या (पीएसी) शिफारसी नुसार आरजीएसटीसी योजनेअंतर्गत संशोधन प्रकल्पासाठी अनुदानासह मान्यता मिळाली आहे.
त्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यातर्फे प्रा.के डी जगताप यांचा सत्कार करण्यात आला आहे.यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य एस व्ही आगरकर उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ एस व्ही आगरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून संस्थेचे अध्यक्ष माझी शिक्षण मंत्री मा. वसंत चिंधुजी पुरके यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयात संशोधनाला चालना मिळाली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. .या उपक्रमाला विभागातील सहाय्यक प्राध्यापक भूषण भट्टी व प्राध्यापक अमोल लिहितकर यांचे सहकार्य लाभले.