मेट तांडा वस्ती करत आहे गावरान गाईचे संवर्धन संगोपन उत्तम पालन पोषण


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


संस्कृतीत गाईला अत्यंत मानाचे स्थान आहे शिवाय भारतीय गावरान गाईचे दूध गोमूत्र हे मानवी प्रकृतीसाठी पूरक आणि पोषकच असते. असे वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झाले. पण आता गोपालक व शेतकऱ्याच्या गोठ्यातील गावरान गाईची संख्या रोडावली असताना जवळच असलेल्या मेट या छोट्याशा खेड्या गावाने गावरान गाईचे पालन संवर्धन व चांगल्या प्रकारे पोषण करत असल्याचे तेथील असलेल्या गावरान गाईच्या संख्येवरून कळते.
गावरान गाईची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली . गावरान गाईपासून शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची बैलजोडी मिळते व त्याचा उपयोग शेतकामात होतो. तसं बघता बैलजोडीची ही संख्या कमी झालेली आढळते शिवाय गावराणी गाईपेक्षा संकरित गायीची संख्या वाढतच चाललेली आहे. तर संकरित गाय ही गावरान गाईपेक्षा दूध देणारी ठरत असल्यामुळे पशुपालकाचा व गोपालकाचा कल संकरित गायकडे वाढत चालला. आर्थिक लाभांमुळे संकरित गाईचे प्रमाण वाढत चालले ग्रामीण भागात वयोवृद्धांकडून जरी गावरान गाईचे महत्त्व नवीन पिढीला सांगण्यात येते तरी पूर्वीच्या काळात गावरान गाईची संख्या मोठ्या प्रमाणात होती परंतु आता दुग्ध व्यवसाय व आर्थिक लाभाच्या हव्यासामुळे संकरित गायीचे प्रमाण वाढले असताना मेट या छोट्याशा खेड्याने गावरान गाईचे अस्तित्व जपण्यामध्ये मोठा सहभाग दिसून येतो या तुलनेत देशी गाईची संख्या दुर्मिळ झाली आहे बोटावर मोजण्याएवढी संख्या आता ग्रामीण भागातही पाहायला मिळत आहे शिवाय आता पूर्वीसारख्या ग्रामीण भागातील जंगलव्याप्त भागात चराईसाठी गवतही मिळत नसल्याने अनेकांनी पशुधन पालना कडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.