
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नगरपंचायत राळेगाव आठवडी बाजार ठेकेदार राजेंद्र शंकर हेटे हे शुक्रवार आठवडी बाजार ची वसुली दादागिरी पद्धतीने छोट्या, मोठ्या व्यवसायिक दुकानदाराकडून करीत असतात त्याची पद्धत शिवीगाळ करणे धमकी देणे त्यांनी सुचविलेली रक्कम देणे होत नसेल तर दुकान लावु नको अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे.
या मुजोर ठेकेदाराला वठणीवर आणण्यासाठी शंकर गायधने, महादेव राव मुखरे, श्रीकांत कोदाणे,योगेश मलोंडे, मंगेश हेटे,सुनिल क्षिरसागर, सुनिल सावरकर,शंतनु सहारे ईत्यादी शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत अधिकारी वर्गासोबत चर्चा करून या मुजोर ठेकेदारावर कार्यवाही साठी पत्र दिले.
या मुजोर ठेकेदाराने शुक्रवारच्या आठवडी बाजारात मुरमुरे फुटाणे विकणारा छोटा दुकानदार संजय हनुमान शिवरकर यांचे सोबत वाद घालुन त्याच्या दुकानातील मुरमुरे फुटाणे चे पॅकींग केलेले पुढे फेकल्याची तक्रार पोलीस स्टेशन ला केली आहे. कळंब ला आल्यावर पाहून घेऊ अशी धमकी दिली आहे त्याच्या तक्रारी वरून राळेगाव पोलीस स्टेशनने नगरपंचायत आठवडी बाजार ठेकेदार राजेंद्र शंकर हेटे यांच्या विरोधात कलम 324(2), 352,351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अशा मुजोर, दादागिरी करणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे व छोट्या व्यावसायिक यांना नगरपंचायत ने सौरक्षण पुरवावे असे पत्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि अधिकारी वर्गासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शिवसेना कार्यकर्त्यांशिवाय व्यावसाईक संजय शिवरकार, अमर शिवरकार, आशा शिवरकार, प्रफुल नान्ने,प्रमोद वानखेडे, सचिन डायरे,पवन अजबैले, गजानन ढुमणे,गजानन शिवरकार, दिपक शिवरकार, विलास शिवरकार, विजय पिंगळे,प्रशांत नगराळे,गणेश पारीसे,मनिषा दिपक शिवरकार, इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.
