राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात देधक्का आंदोलन

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी,वरोरा

इंधन दरवाढ विरोधात केंद्र सरकारचा निषेध

वरोरा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतदादा पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख ,युवक जिल्हाध्यक्ष श्री. नितिन दादा भटारकर तसेच विधानसभा अध्यक्ष श्री. विलास भाऊ नेरकर यांच्या आदेशाने आज दि.२१/०७/२०२१ रोजी इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस, चे दरवाढ गेले काही दिवसा पासून खूप वाढत असल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. या विरोधात आंदोलन करून घोषणा देत
वारे मोदी तेरा खेल ! महंगा सिलेंडर महंगा तेल !

पेट्रोल डिझेल दरवाढ तातडीने थांबवा !

मोदीजी आप सरकार चालाने मे हो गये फेल

“मोदी हटाओ!
देश बचाओ ” !

बेशरम मोदी होश मे आओ!
जनता से तुम ना टकराओ”!
असे नारे देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गॅस दरवाढ किमती 25रुपयांनी वाढविल्या,त्यामुळे मागील एक वर्षांपासून आधीच कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत आहे, शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे व डिझेलचे दर गेलेले आहेत.ही गॅस दरवाढ तात्काळ मागे घेऊन कमी करण्याची मागणी साठी केंद्र सरकार विरोधात निषेध करण्यात आला. या प्रसंगी गाडीला धक्का मारत दे धक्का आंदोलनं करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे , विनोद कोठारे, विजय कुडे , रुपेश पाल , रंजीत कुडे, साहिल पानतावणे, निखिल पाचभाई, कृष्णाजी कुचनकर , रोशन भोयर , राहुल कुडे , अनिकेत राउत, प्रशांत कुडे योगेश पुसदेकर दीपक कूडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.