
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील वर्धा वडकी रोड वर आज रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास निधा येथील ट्रॅक्टरने जात असलेले शेतीचे अवजारे दुरुस्ती करीता आपल्या ट्रॅक्टरचे पणजी त्याचा पाय तुटल्याने वेल्डिंग करण्याकरिता वर्धा बायपास वरून सामोर जात होते, परंतु आज रोजी राळेगाव येथील बायपास वर पंजीचा पाय खाली पडल्याने त्यांना उचलण्याकरिता ड्रायव्हर व त्याचा मित्र सोबत असलेला हा खाली उतरला व उचलत असताना राळेगाव कडून रेतीचा उपत्सा करून येणारा खाली ट्रक हा भरदाव वेगणे वर्धा कडे जात असल्याने दोघांनाही जागेवर चिरडले त्यामध्ये त्यांचा दोघांचाही जागीच मृत्यू झाला त्यात मनोज जुमनाके वय वर्ष 23 व करण मेश्राम वय वर्ष 22 हा जागेवरच आपले प्राण सोडले तर बाळू साळवे वय वर्ष 43 हा गंभीर जखमी आहे त्याला यवतमाळ येथे पाठविण्यात आले, हा अपघात इतका भीषण होता की ट्रक हा ट्रॅक्टरला घासून ट्रॅक्टर वर बसून असलेला तिसरा हा गंभीर जखमी झाला या घटनेने तालुक्यात झालेल्या रोडची टीका तीपणी दिसून येत आहे व तालुक्यात शोककळा पसरली आहे.
