
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रोहिणी येथील शेतकरी अशोक गोविंदरावजी ठाकरे यांच्या शेतामध्ये भव्य पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला.
या पीक पाहणी कार्यक्रमाकरिता प्रगतशील शेतकरी म्हणून बाबारावजी घिनमीने (धानोरा), रामदासजी गावंडे (येवती), संतोषराव पारधी (येवती), अरुण वसंतराव पन्नासे, सतीश तुकाराम कापटे आदींसह येवती, धानोरा,परसोडा , वनोजा व इतर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बंसल सीड्स, खंडवा येथील झोनल मॅनेजर प्रमोदजी जमणारे यांनी सोयाबीनचे संशोधित वाण संचय या बद्दल सखोल माहिती दिली. तसेच रब्बी हंगामातील गहूचे संशोधित वाण तर्ष आणि हरभरा पिकाबद्दलही शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुण मंडळींनी मनापासून सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुयोग्य संचालन व आभार प्रदर्शन अनिकेत खंडार (टेरीटरी मॅनेजर, बंसल सीड्स) यांनी केले.
या पीक पाहणी कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या सुधारित बियाण्यांविषयी जागरूकता निर्माण झाली असून याचा थेट लाभ येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांना होणार आहे.
