
वरोरा शहराचा गजबाजीचा समजला जाणारा रत्नमाला चौकात नाकाबंदी सुरू असताना बलेनो चारचाकी वाहन क्र. एम एच 34 बी आर 8593 ला पोलिसांनी चौकशीसाठी थांबविले असता देशी बनावटीच्या पिस्तूलासह 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
यात पुनमचंद येलय्या (34 ) व अभिलाष पंचल (30) दोघांना अटक करण्यात आली. कोणताही घातपात घडविण्यासाठी पिस्तुल आणली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
