मुलींना येणाऱ्या समस्या महिला शिक्षिकांना सांगण्यासाठी संकोच बाळगू नका :- सौ.कुंदा काळे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 27/9/2022 रोज मंगळवारला शालेय परिसरात दामिनी पथकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या मार्गदर्शन शिबीरात महाविद्यालयीन शिक्षिका सौ.कुंदा काळे यांनी विद्यार्थीनींनी शालेय परिसरात वावरत असताना आपल्या वयक्तिक पातळीवर भेडसावणाऱ्या समस्या आपल्या महिला शिक्षिकाजवळ कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता व्यक्त करायला पाहिजे.सोबतच शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुध्दा सहकार्य करावे. अशाप्रकारे माहिती दिली.सोबतच सौ.वंदना वाढोणकर महाविद्यालयीन शिक्षिका यांनी सुध्दा यथोचित मार्गदर्शन केले..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वाती नैताम मॅडम यांनी केले तर आभार कु. वैशाली सातारकर मॅडम यांनी मानले.या कार्यक्रमाला सौ.दिपाली कोल्हे मॅडम,कु.रूचिका रोहोणकर मॅडम,कु.अश्विनी तिजारे मॅडम उपस्थित होते.या कार्यक्रमात भरपूर विद्यार्थीनीं सहभागी झाल्या होत्या.