बोर्डा शिवारात वाघाची दहशत


वणी :- तालुक्यातील बोर्डा शिवारात वाघाची दहशत पसरली असून ता. ४ रोजी चरायला गेलेली गाय परत न आल्याने तिचा शोध घेतला असता तिचा मृत्यदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत सापडला सदर गाय ही वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगितले जात आहे.
बोर्डा येथील गरीब शेतकरी शेषराव दशरथ जीवतोडे यांच्या मालकीची अंदाजे ३० हजार किमतीची गाय ता. ४ रोजी चरायला जंगलात गेली असता ती सायंकाळी चरून परत न आल्याने तिचा शोध सकाळी ता. ५ रोजी घेतला असता ज्या भागात गाय चरायला गेली होती त्या भागातील जंगलात जाऊन शोध घेतला असता सदर गाईचे मृत शरीर हे अर्धवट झालेल्या अवस्थेत आढळले असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी वणी यांचे कडे संबंधित शेतकऱ्याने अर्ज दाखल केला आहे