गांजा विकणा-या इसमाविरुध्द पोलिस ठाणे वरोरा व स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई , १ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त

वरोरा शहरातील हनुमान वार्ड, वरोरा येथील संघपाल उर्फ संग्राम लभाणे यांचे घरी गुप्त माहितीच्या आधारे रेड केली असता रसिका संघपाल उर्फ संग्राम लभाणे, वय ३६ वर्षे संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाणे, वय ४६ वर्षे, दोन्ही रा पंकज टॉकीज मागे, हनूमान वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर हे स्वतःच्या आर्थीक फायदया करीता मनोव्यापारावर परीणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस / गांजा वनस्पतीचे पाने फुले व बिया यांची विक्री करण्याकरीता घरी १.३०० किलो ग्रॅम बाळगून आले. त्याचे विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S.Act) १९८५ मधील कलम ८ (क), २० (ब) (ब) NDPS कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघपाल उर्फ संग्राम वासुदेव लभाने यांस पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक मॅडम चंद्रपूर, मा. नयोमी साटम मॅडम, सहायक पोलिस अधिक्षक तथा पोलिस उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनामध्ये पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक दिपक ठाकरे सोबत पोलिस हवालदार दिलीप सुर, मोहन निषाद, पोलिस अंमलदार मनोज ठाकरे, महिला पोलिस अंमलदार तेजस्वीनी गारघाटे सोबत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, सहायक फौजदार स्वामीदास चालेकर, सहायक फौजदार धनराज करकाडे, पोलिस हवालदार नितीन कुरेकर, पोलिस हवालदार प्रशांत नागोसे, पोलिस अंमलदार प्रशांत बदामवार यांनी केली.
सर्वसामान्य जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, वरोरा पोलिसांनी अवैध धंदे करणारे धंदेवाईक गुन्हेगार इसम आणि सराईत गुडं इसमाविरुध्द धडक कारवाई मोहीम हाती घेतली असुन, पोलिस स्टेशन हददीत असे गुन्हे करणारे गुन्हेगार इसम दिसुन आल्यास त्वरीत माहीती पोलिस स्टेशन वरोरा फोन कं. ०७७६-२८२०९३ वर किंवा पोलिस नियंत्रण कक्ष येथे १०० / ११२ क्रंमाकावर दयावी.