ढाणकी शहरातील दोन तरुण तालीम पूर्ण करून सैन्यात दाखल टेंभेश्वरनगरातील नागरिकांनी केला तरुणांचा आणि पालकांचा सत्कार


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ


दिनांक ६/ ८/ २०२३ रविवार रोजी ढाणकी शहरातील टेंभेश्वरनगर मधील दोन तरुण भारतीय सैन्य दलात आपली तालीम पूर्ण करून दाखल झाले त्या निमित्ताने त्यांचा व विशेष करून अत्यंत बेताची परिस्थिती असताना सुद्धा आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले ज्या पालकांनी यांना घडविले ते नामदेव गायकवाड , गुणाजी ढोबळे यांचा खऱ्या अर्थाने हा गुणगौरव सोहळा होता शिवाय अत्यंत बेताच्या परिस्थितीत आपले लक्ष विचलित होऊ न देता या दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे जाण ठेवली व भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते स्वप्न अनेक जण बघतच असतात पण ते सत्यात उतरवणे हे तितकेच जिकिरीचे असे असताना सुद्धा येणाऱ्या सर्व संकटावर व अडथळ्यांना पार करून राजू ढोबळे व ओम गायकवाड या दोन तरुणांनी स्वप्न सत्यात उतरून दाखविले मध्यमवर्गीय परिस्थिती त्यातल्या त्यात घरी शिकून मार्गदर्शन करणारे सुद्धा यांना नसताना स्वतःच्या कर्मावर आणि स्वतः गेल्या अनेक दिवसापासूनच्या महेनतीवर आत्मविश्वासाने अनेक परीक्षांना समोर जाऊन या दोघांनी अखेर यशश्री खेचून आणली विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी हे मोठ्या शहरांमध्ये जाऊन अनेक महागड्या अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन तयारी करताना आपण बघतोच आहे तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही पण ढाणकी शहरातील झोपडपट्टी संबोधतो अशा ठिकाणच्या या दोन तरुणांनी एक नवा आदर्श सर्वासमोर ठेवला स्वतःचे गुरु आणि मार्गदर्शक स्वतः बनवून एका नव्या पर्वाची सुरुवात केली त्यांना घडविणाऱ्या आई वडिलांच्या ऋनांचा हा सत्कार होता. कार्यक्रम ज्या सभागृहात आयोजित केला होता तो सभागृह मान्यवरांनी तरुणांनी भरगच्च भरला होता. भारतीय सैन्यात दाखल झालेल्या तरुणांसोबत सेल्फी काढण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी व नागरिकांनी गर्दी केली होती या गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष आपल्या कामाला व्रतस्थ असणारे पोलीस पाटील रमण रावते हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद आडे, सुभाष गायकवाड, अशोक गायकवाड(पत्रकार), दीपक चंद्रे, भास्कर चंद्रे, राहुल नरवाडे, दिलीप कलाले, मुन्ना भंडारे, ओम खोपे ,दिगंबर हांडगे, शेख झाकीर, राम सोनुने, शेख मोईन, रमेश धुळे,महेश पिंपरवार, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती


राजू ढोबळे, ओम गायकवाड या दोन्हीही तरुणांनी आपल्या जिद्दीने व कर्तुत्वाने हे यश संपादन केले असले तरी खऱ्या अर्थाने त्यांना उत्तम संस्कार बिंबविले ते त्यांच्या आई-वडिलांनी म्हणूनच त्यांच्या यशात त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा मौलाचा वाटा आहे टेंभेश्वर नगर अर्थातच आपण ज्याला झोपडपट्टी समजतो त्या ठिकाणचे दोन तरुण हे भारतीय सैन्यात दाखल झाले त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात हे दोन तरुण अनेक जणांचे प्रेरणास्थान असतील एवढे नक्की


रोहित वर्मा
शहरप्रमुख
भारतीय जनता पार्टी