शेती विशेष :अल्पभूधारक युवा शेतकऱ्यांनी फुलविली टरबुजाची बाग



राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील अल्पभूधारक युवा शेतकरी सुखचंद वडगुजी वाढंई शेती एक हेक्टर या युवा शेतकऱ्यांनी दोन एकर मध्ये टरबुजाची बाग फुलवल्याने या शेतकऱ्याला यामधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे. सविस्तर वृत्त असे पाच ते सहा वर्षा आधी या युवा शेतकऱ्यांच्या वडिलांचा शेतामध्ये काम करत असताना सर्प दंश होऊन मृत्यू झाला होता त्यानंतर घरातली सर्व जबाबदारी या युवा शेतकऱ्यांच्या आईवर आली होती. घरात मोठा परिवार असल्याने या शेतकऱ्यांच्या आईवर मोठे आभाळ कोसळले होते. परंतु या संकटावर मात करत आईने दोन मुलींचे लग्न करून मुलाने शेती सांभाळली यामध्ये मुलाने भाजीपाला लावून छोटा मोठा भाजीपाल्यांचा व्यवसाय उभा करून आपला उदरनिर्वाह करणे चालू केला असता अचानक या युवा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये फळबाग करण्याची इच्छा झाली सदर त्याला याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नसताना सुद्धा या शेतकऱ्यांनी युट्युब द्वारे माहिती घेऊन आपल्या शेतात चक्क टरबुजाची बाग फुलवून आज त्या बागेमध्ये तीस ते चाळीस टन इतके टरबुजाचे उत्पन्न निघणार असून यामध्ये तीन ते चार लाखाचे उत्पन्न होणार असल्याची माहिती या युवा शेतकऱ्यांनी दिली आहे . सदर संकटाला न घाबरता संकटावर मात करून पुढे जावे असे या शेतकऱ्यांनी देशोन्नती सी बोलताना सांगितले आहे