
प्रशासनाने किती लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली
सहसंपादक : रामभाऊ भोयर
घरकुल मिळाली रेती मिळणार कुठे ? प्रशासन घिरट्या घालण्यात व्यस्त महसूल कर्मचाऱ्यांच्या या तहसील मधून मर्जीच्या कर्मचाऱ्यांना तालुक्यांत आपण किती सक्षम आहोत हे वरील अधिकाऱ्यांना दाखवून देण्याचा स्थानिक अधिकाऱ्याचा प्रयत्न परंतु, यात सर्वसामान्य घरकुल लाभार्थी संकटात सापडला आहे.तेव्हा साहेब रेती मिळणार कुठे? शासनाचा मोफत वाळूचा आदेश गेला कुठे? घरकुल लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. किती लाभार्थ्यांना आपण रेती उपलब्ध करून दिली. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना शासनाचा आदेश असताना हे रेती पळवा पळवीचे राजकारण काय चालू आहे. हे न समजणारे कोडे आहे. घरकुलाचे बांधकाम थांबल्याने लाभार्थी अस्वस्थ झाला आहे. येणारी रेती ही महाग असल्याने त्याला न पडवळणारे आहे. अशा परिस्थितीत घरकुल लाभार्थी संकटात सापडला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने रेती अभावी घरकुलाची कामे रखडल्या आहे. घरकुल लाभार्थ्यांचे हाल प्रशासन समजून घेणार का एकीकडे शासन घरकुल योजना राबवून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यात प्रयत्न करीत आहे.
परंतु दुसरीकडे रेती अभावी घरकुल पूर्ण होत नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने बाब लक्षात घेऊन त्या घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी. गरजवंतांना ग्रामीण भागात व शहरी भागात घरकुलाची कामे मंजूर करण्यात आली आहे. तेव्हा प्रशासनाने काळजी घ्यावी. यात ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.
परंतु प्रशासन मात्र, पळवा पळवीचे राजकारण करत असल्याने आपण रेती चोरी बाबतीत किती सक्षम आहोत हे वरिष्ठंना दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत का? तेव्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
