
.
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या पवित्र सणाचे औचित्य साधून सोनामाता हायस्कूल चहांद येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम निसर्ग हा आपला पाठीराखा आहे, वृक्ष हे आपले बांधव आहेत ही भावना मनात ठेवून विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी वृक्षाला राखी बांधली. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संवर्धन करत निसर्गाचा समतोल कसा राखता येईल, यासंबंधी मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांची घरातील शोभेच्या व टाकाऊ वस्तूंपासून राखी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर, मनमोहक, उत्कृष्ट अशा राख्या तयार केल्या. या राख्यांचे प्रदर्शन शाळेच्या आवारात भरवण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट राख्या बनवल्या त्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यानंतर शाळेतील सर्व मुलींनी शिक्षकांना तसेच मुलांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक चिव्हाने सर, शिवणकर सर, कांबळे सर, दांडेकर सर, सावंत सर, गावंडे मॅडम, गोवार्दिपे मॅडम, प्रथमेश राऊत, देवानंद सोनवणे हे उपस्थित होते. शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन माननीय दांडेकर सर व आभार गावंडे मॅडम यांनी मानले.
