प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट,शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेली सरसकट मदत करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी

हिंगणघाट:-२२ डिसेंबर २०२२


सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी तीन हेक्टर पर्यंत जाहीर केलेले मदत सरसकट देण्याबाबत तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबद माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूर येथील बंगल्यावरती भेट घेऊन निवेदनाद्वारे साकडे घातले.
अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसाने झाले असुन शेतक-यांना राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत महसुल विभागामार्फत बँकेत जमा झाली. परंतु तीन हेक्टर पर्यंत सरकारने जाहीर केलेली मदत अत्यल्प मिळाल्याने शासनाने शेतक-याच्या तोंडाला पाने पुसले आहे.
जुलै ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उध्वस्त झाली, जळाली, रखडुन गेली, गाळ साचला इत्यादी नैसर्गिक कारणासाठी सरकारने साडेसात एकर,८ एकर,१० एकर,१२ एकर,१५ एकर,२० एकर,२५ एकर,२९ एकर जमिनीसाठी सरकारने सरसकट तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली. परंतु महसुल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने १ हेक्टर,२ हेक्टर अशी अतिवृष्टीचे क्षेत्र दाखविल्यामुळे शेतक-यांच्या बँक खात्यात १३ हजार रूपये,८ हजार १६० रूपये,२० हजार रूपये अशी रक्कम झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे साडेसात एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमिन आहे अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत म्हणजेच ४१ हजार ४०० रूपये मिळाले नाही. त्याचप्रमाणे ओलीत शेतीला २७,००० रूपये प्रती हेक्टर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी ३६,००० रूपये, रखडुन गेलेल्या जमिनीसाठी ३७,५०० रूपये प्रमाणे मदत दिली नाही.
त्याला सर्वस्वी जबाबदार महसुल विभागातील एस.डी.ओ, तहसिलदार,नायब तहसिलदार, पटवारी इत्यादी अधिकारी जबाबदार आहे.अतिवृष्टीच्या काळात प्रशासकीय अधिकारी हेडक्वार्टर वर राहत नाही.घरी बसुन अतिवृष्टीचे क्षेत्राचे मोजमाप पुर्णपणे पाठवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेली ससकट तीन हेक्टर पर्यंतचे आर्थिक मदत मिळु
शकली नाही. याला सर्वस्वी महसुल विभाग जबाबदार आहे त्याची सरकारने त्वरीत दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे.
ऑक्टोंबर महिण्यात परतीच्या पावसामुळे सोयाबीन सवंगणे कठीन झाले आहे.परतीच्या पावसामुळे सोयाबीनच्या दाण्याला कोंबे फुटली असून पिकाचे ढीग सडले आहे. काही शेतकऱ्यांना शेतात पाणी असल्यामुळे ढगाला बुरशी लागली असून सोयाबीनचे ढीक सडले असून दुर्गंध सुटला आहे कपाशीचे पिक जेमतेमंदन निंदन, डवरन,फवारणी व सल्फेट देवून बहरत आहे. सततच्या पावसामुळे फुले फळे बुरशीजन्य रोगामुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे गळून पडले आहे. कर्जाने उभी केलेली शेती अतिवृष्टीमुळे उदध्वस्त होऊन शेतकरी अंधकारमय चाकोरीतून वाटचाल करीत आहे. अशाप्रकारे शेतक-याचे जनजीवन विकळीत झालेले प्रशासकीय अधिका-यांना दिसत असतांना सुध्दा शेतकरी बापाला आत्महत्येकडे प्रवृत्त करण्याचा प्रकार सुरू आहे.
यावर्षी शेतकरी संकटात असुन अतिवृष्टीने अनेक भागात पिके वाहुन गेली आहे. शेतजमीन खरवडुन गेल्याने नापिकीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे. शेतात गाळ साचल्यामुळे शेतातील उभी पिके जळली आहे. पशुधन पुराच्या पाण्याने वाहुन गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. परतिच्या पावसाने हाताशी आलेला पिक हिरावुन गेले आहे.खरीपा बरोबर रब्बीचा हंगाम वाया गेला आहे.
शेतक-यांना संकटातुन बाहेर काढायची भूमिका सरकारची असेल तर आला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी एक लाख, फळपिकांना हेक्टरी दीड लाख रूपयाची मदत जाहीर करून दिलासा दयावा.
तसेच सरकारने अतिवृष्टी, खरडुन गेलेल्या शेत जमीनीची हेक्टरी जाहीर केलेली ३ हेक्टर पर्यतची सरसकट मदत
देण्यात यावी असे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरती भेट घेऊन साकडे घातले.