गोविंदपुर येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला, हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी


प्रतिनिधी, प्रवीण जोशी.
ढाणकी.


ढाणकी येथून जवळच असलेल्या जेमतेम हजार ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या गोविंदपुर येथील शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून त्याला आपल्या अणकुचीदार नखाने अनेक ठिकाणी वार करून प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव होईल अशा प्रमाणात जखमी केले.
त्याबाबत वृत्त असे कळते की मौजा कृष्णापुर गट ग्रामपंचायत शी निगडित असलेल्या गोविंदपुर येथील अनिल दिगंबर चव्हाण वय वर्ष अंदाजे 45 वर्ष हे रोजच्या प्रमाणे दैनंदिन काम करण्यासाठी शेतात गेले असताना आपले ठराविक काम करत होते.पण अचानक काही कळायच्या आत झुडपामध्ये दडून बसलेल्या अस्वलाने प्रचंड हल्ला केला यामध्ये अस्वलाने पाठीवर पोटाला आणि डोक्यावर अनेक ठिकाणी वार केले या हल्ल्यामध्ये जखमी शेतकऱ्यांने मोठ्या हिमतीने असलेले अवसान एक वटून प्रचंड आरडाओरड केल्यानंतर शेताच्या शेजारीच असलेल्या लक्ष्मण रेणू राठोड यांनी मोठ्या हिमतीने अस्वलाचा प्रतिकार करून आधीच गंभीर असलेल्या अनिल यांना पुढील जखमा होणार नाही याची दक्षता घेऊन अस्वलाला जंगलामध्ये पिटाळून लावले. आणि घडलेली सविस्तर घटना गावकऱ्यांना सांगितल्यानंतर गावातील काही तरुण मदतीला धावले व जखमी असलेले शेतकरी अनिल दिगंबर चव्हाण यांना जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणले. व प्रथम उपचार करून जखमेची तीव्रता बघून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे समजते. या गंभीर हल्ल्यामुळे जंगलाच्या शेजारी व आजूबाजूचे सर्व शेतकरी भयभीत झाले. असून वनविभागाने याचा बंदोबस्त करणे जिक्रीचे बनले आहे. व शेतकऱ्यांनी सुद्धा याबाबत जागरूक आणि दक्ष राहणे गरजेचे आहे तसेच नियमित लागणारे सरपण आणण्यासाठी व काही दिवसांनी कोरडवाहू शेतातील उन्हाळी कामे होण्यास सुरुवात होते. तेव्हा ही कामे करण्यासाठी भल्या पहाटेच जावे लागते त्यामुळे जाताना सावधानी व काळजी घेणे गरजेचे बनले आहे. दरम्यान या अशा गंभीर केलेल्या अस्वलाच्या हल्ल्यानंतर संबंधित वनविभाग काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.