
प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी,दिनांक ८ बुधवारला रोजी
सुवर्णकार बांधवांचे आराध्य दैवत
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती निमित्त सर्व सुवर्णकार बांधवानी मोठ्या उत्साहाने, व आनंदाने नरहरी महाराज जयंती साजरी करण्यात आली. ढाणकी शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. शहरातील सर्व सुवर्णकार बांधव ,प्रतिष्ठित नागरिक, युवा वर्ग ,लहान चिमुकले व महिलांचा मोठा सहभाग शोभायात्रेत दिसून आला. टाळ मृदंगाच्या गजराने ढाणकी नगरी दुमदुमून गेली होती. शहरातील भजनी मंडळांनी या रॅलीमध्ये विशेष सहभाग घेऊन शोभा यात्रेत अधिकच सुबकता वाढवली.टाळ- मृदंगाचा गजर, रिक्षांवर विविधरंगी फुले आणि लाईटच्या माळांची सजावट, रस्त्यावर काढलेल्या रांगोळीच्या पायघड्यांवरून शेकडो शहरवासीयांच्या उपस्थितीत संपूर्ण शहरातून संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचा फोटो लावून अतिशय शांतपणे शोभायात्रा काढली गेली. व , स्थानिक सुवर्णकार बांधवांनी येथे ह.भ. प.कल्पनाताई देशमुख(काळे ) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
