
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
श्री महावीर इंग्लिश मीडियम हायस्कूल, राळेगाव घवघवीत यशाची परंपरा कायम Rationalist Talent Search Exam (RTSE)2023 तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत न्यू इंग्लिश हायस्कूल या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली.यामध्ये कु.वेदिका नितीन वांगे( वर्ग 4थी) राहणार आपटी श्री महावीर कॉन्व्हेंट अँड इंग्लिश मीडियम हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिने174 गुण घेऊन राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल गुंदेचा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नुपूर कोमेरवार यांनी कौतुक केले. RTSE -2023 या परीक्षेची पूर्व तयारी तयारी शाळेतील शिक्षक श्री विजय थूल यांनी सांभाळली आणि वर्गशिक्षिका कु. निकिता दारुंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्री महावीर इंग्लिश मीडियम हायस्कूल, राळेगाव या शाळेने विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सहभागी करून घवघवीत यशाची विद्यार्थ्यांना परंपरा कायम ठेवत ही संस्था नावारूपास येत आहे.
