
राळेगाव तालुका काॅंग्रेस पक्ष व शहराच्या वतीने आज दिनांक 31/5/2023 रोज बुधवारला भाऊसाहेब कोल्हे सभागृहात नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता पंरतु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यानंतर काॅंग्रेस पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दिनांक 30/5/2023 रोज मंगळवारला पहाटे तीन वाजता दिल्ली येथे निधन झाल्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी समसुचकता राखून हा सत्कार सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद वाढोणकर यांनी केले.सोबतच काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सोबतच मतदारांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.उपस्थित संचालकांचे शब्दसुमनानी स्वागत करून त्यांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काॅग्रेस पक्षाचे राळेगाव शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे यांनी केले तर आभार काॅंग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी मानले.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे संचालक, वसंत जिनिंगचे संचालक, तालुक्यातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
