गुढी म्हणजे मांगल्याचे संकल्पाचे प्रतीक


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यात येतो अर्थातच आजचा गुढीपाडवा होय. पाडवा दिवस म्हणजे कार्य सिद्धी जाण्यास संकल्प करण्याचा दिवस व वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक गुडी हे मांगल्याचे प्रतीक आहे गुडी म्हणजे एक विजय ध्वज होय प्रत्येक कार्य तडीस गेल्यानंतर गुढी उभारून त्यास समर्पण करतात तत्कालीन काळात गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत असला पाहिजे प्रभू रामचंद्राने वडिलांच्या आज्ञेला शिरोधार्य मानून वनवास पूर्ण केला व श्रीराम या दिवशी अयोध्येत परतले तेव्हा आयोध्या वासियांना आनंद झाला त्याक्षणी प्रभू रामाचे गुढी उभारून स्वागत केले ती गुढी आनंदाची होती व न्यायाने अन्यायावर केलेली एक प्रकारे मातच होती अर्थातच प्रभु रामचंद्रांनी रावणावरील विजय प्राप्त केला होता तशी ती गुढी उभारली होती तत्कालीन काळात विजय उत्सव साजरा करण्यासाठी गुढी उभारत असत माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा गुढीचे महत्त्व आपल्या शब्दांमध्ये ओवीबद्ध करताना म्हणाले.

माझी अवसरी ते फेडी! विजयाची सांगे गुडी येरू जीवी म्हणे सांडी! गोठी यीया
ज्यावेळी तत्कालीन काळात युद्धभूमी मध्ये काही संदेश जावयाचा असल्यास बहुदा गुढीचा उपयोग होत असावा कारण गुढी हे ध्वजाचेच प्रतीक आहे माऊलींनी गुढी विषयी आपले मत त्या काळात व्यक्त केल्यानंतर क्रांतिकारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा त्यांच्या मराठीच्या साहित्यातून अवलोकन करून अतिशय सुंदर शब्द मांडणी केली
गुढीपाडव्याचा सण! आता उभारा रे गुडी!!
नव्या वरसाच देणं
सोडा मनातली आडी!!
गुढीपाडवा म्हणजे नव्या संकल्पची सुरुवात संपत असलेल्या वर्षात काही यश अपयश आले असल्यास ते बाजूला सारून नवीन संकल्प करून तो सिद्धीस नेणे होय तसेच एकमेकांबद्दल मनभेद मतभेद हे सगळे बाजूला सारून नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे येणारे नवीन वर्ष कलुषित मनधारणा न ठेवता ती आनंददायी ठेवून जीवनाचा आनंद घ्यावा असा उपदेश बहिणाबाईंनी बहुदा दिला असावा
.