श्रीराम जन्मोत्सव तथा श्रीराम कथा आत्मज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन

श्री हंस सेवाधर्म आश्रम व गुरुदेव सेवा हरिपाठ मंडळ व समस्त गावकरी मंडळ बोरी इचोड यांच्या संयुक्त विद्यमाने

सहसंपादक -रामभाऊ भोयर

श्रीहंस सेवाधर्म आश्रम गुरुदेव सेवा हरिपाठ मंडळ व समस्त गावकरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड येथे बुधवार दिनांक २२ मार्च ते गुरुवार दिनांक ३० मार्च पर्यंत श्रीराम जन्मोत्सव तथा श्रीराम कथा आत्मज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रामायन कथेच्या प्रवक्त्या श्री राधिका श्री किशोरीजी वात्सल्यग्राम आश्रम रुंदावन मथुरा यांच्या मधुर वाणीतून होणार आहे,तसेच आर्गन वादक सुधाकर घागरे रुपेश भिया,तबला वादक अक्षय भीया,ऑक्तो पॅड सोनू भिया,झांकिकार कुंजबिहारी झाकी ग्रुप राजस्थान यांचा संगीत विभाग संच राहणार आहे.
या कार्यक्रमाची रूपरेषा बुधवार दि.२२ मार्च रोजी कलश स्थापना अक्षरनानंद महात्माजी यांचे शुभहस्ते होणार आहे.दैंदिन पहाटे ४ ते ५ ध्यानपाठ,पहाटे ५ ते ६ काकडा,सकाळी ८ ते ११ रामकथा प्रवचन,सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक प्रार्थना,सायंकाळी ६.३० ते ७.३० माऊलीचा हरिपाठ,रात्री ८ ते ११ रामकथा असा दैनदीन कार्यक्रम होणार आहे.
नंतर दि ३० मार्च रोजी सूश्री राधिका श्रिकिशोरिजी यांचे दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन करून नंतर ४ वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करून श्री राम कथेची समाप्ती करण्यात येणार आहे.