


चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याने बैंकेवर एसआयटी चौकशी सुरु असतानाच बैंकेच्या संचालक पदाच्या निवडनुका पार पाडल्या यामध्ये भाजप समर्थित 9 उमेदवार निवडून आले, मात्र सत्ता स्थापनेसाठी किमान 11 संचालकाचे समर्थन असावे लागते, दरम्यान रवींद्र शिंदे यांच्याकडे तीन संचालक असल्याने त्यांच्या समर्थन मिळाल्यास भाज पा या पहिल्यांदा अध्यक्ष बनू शकतो अशी परिस्थिती होती . आज भाजपा ने राजकीय खेळी खेळत रवींद्र शिंदे यांचा भा पा प्रवेश करवून घेतला .त्यामुळे आता उबाठा जिल्हाध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवारांची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे . अशातच वैभव डहाणे यांचे नाव पुढे येत असल्याचे दिसून येत आहे .
मागील काही वर्षांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या वरोरा भद्रावती विधानसभा समन्वयक म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडणारे आपल्या वेगवेगळ्या आंदोलनातून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाची भांडणारे , सामाजिक प्रश्नांसाठी वेळोवेळी स्वतःवर वेग कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यावरही न्यायासाठी झटणारे वैभव डहाणे यांचे नाव पुढे येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच .
