
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत समाधान शिबिरामध्ये कृषी विभागा मार्फत कृषी यांत्रिकीकरण उप अभीयान योजनेतून भास्कर चंपत मांढरे रा. इचोरा व श्रीकांत प्रभाकर गांजरे रा. बोरी यांना आमदार प्रा. डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते ट्रॅक्टर व आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत भाजीपाला लागवड करण्याकरिता मिनी किट चे वाटप करण्यात आले.
यामध्ये विविध योजनेतून लाभार्थ्यांना विवीध घटकाच्या पूर्व संमती पत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, मंडळ कृषी अधिकारी राजु ताकसांडे कल्पेश वाघमारे, तुषार मेश्राम आत्मा अध्यक्ष गोहणे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
