सरसम येथील ग्रामसेवक राजेंद्र भोगे यांची ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी :प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेली कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवक राजेंद्र भोगे यांची हिमायतनगर तालुक्याच्या ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे अनेक स्तरावरून अभिनंदन होत आहे.
सरसम ( बु ) येथे आपल्या कार्यात कोणताही कसूर न सोडता जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपली सेवा समर्पित करत आपले कार्य चालू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हिमायतनगर तालुक्याच्या ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी ग्रामसेवक राजेंद्र भोगे यांची निवड करण्यात आली आहे.याबद्दल दिनांक २ सप्टेंबर रोजी सरसम (बु) येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राम कोटगिरे सर ,चक्रधर देशमुख सर ,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गोविंद गोडसेलवार, सरपंच प्रतिनिधी सखाराम ठाकूर ,माजी उपसरपंच राम गुंडेकर ,कपिल कांबळे, संतोष डाके सर ,सरसम सोसायटीचे चेअरमन मारोतराव मोरे ,सेवक संभाजी सूर्यवंशी, अमोल कांबळे, विजय वाठोरे यासह अनेकांची उपस्थिती होती.