राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने चंद्रपूरात भव्य बहुजन आक्रोश मोर्चाचे आयोजन

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

चंद्रपूर -: आज साेमवार दि. २६ जूलैला दुपारी १२ वाजता विविध मागण्यांच्या संदर्भात स्थानिक डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या जवळुन चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन आक्रोश मोर्चा जात असुन या माेर्चाचे आयोजन राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती प्रा.सुचिता खाेब्रागडे यांनी आज दिली.

SC, ST, OBC, vjnt, DNT, इत्यादींचे हक्क, अधिकार संपुष्टात आणले या विराेधात या भव्य माेर्चाचे आयोजन केले आहे. एकूण 14 मुद्यांवर हे आंदोलन होत असुन बहुजन आक्रोश मोर्चात जास्तीत जास्त संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन “प्रतिनिधित्व बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलन” जिल्हा समितीच्या प्रा. सूचिता खोब्रागडे, संजय पाटील, अशोक तुमराम, धनराज गेडाम,पी एम डांगे, सुधाकर चौखे, प्रा .कविता चंदनखेडे, डॉ .ज्योत्स्ना भागवत के .एस .पडवेकर, संघमित्रा सोनटक्के, विकास काळे, डॉ .गौतम नगराळे, सुयोग डंबारेे, संदीप कौवे, नितेश सिडाम, विट्ठल येडमे, मनोहर बांदरे, रचना गेडाम, हर्षानंद भवरे, दिनेश शाक्य , डॉ.महेश खानेकर, सप्रेम गेडाम,प्रकाश गजभिये, अभिषेक भसारकर,अरविंद अम्बुलकर, प्रा .स्मिता राऊत, किसन बावने, धंमु नगराळे, स्वप्निल धुरके , आदीं पदाधिका-यांनी एका पत्रकातुन केले आहे.