
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष. असे एक ना अनेक ठिकाणी धानोरा शेत शिवारात रोहित्र उघडेच एखाद्या दिवशी मनुष्य जीवीत हानी झाल्यास याला जबाबदार कोण? यवतमाळ जिल्हा महावितरण अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे शेतकरी विजय गुजरकर यांची १५ ते २० हजार रुपयांची गाय उघड्या रोहित्र्याला करंट लागुन मरण पावल्याची दुर्दैवी घटना धानोरा येथे घडली आहे. सविस्तर वृत्त असे धानोरा येथील अल्पभूधारक शेतकरी विजय गुजरकर यांची गाय गावालगत असलेल्या उघड्या रोहित्र्याला करंट लागुन मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याने धानोरा गावात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे सदर धानोरा परिसरात सगळीकडेच रोहित्र उघडेच आहे तर कुठे वीजेची खांब सुध्दा झुकलेली आहे परंतु याकडे राळेगाव महावितरण कार्यालयाचे अधिकारी जाणुन बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे. महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेऊन सुध्दा राळेगाव महावितरण विभाग उंटावरून शेळ्या हकलत असल्याचे दिसून येत आहे.सदर आज एका गाईचा करंट लागुन मृत्यू झाला आहे तर उद्या एखाद्या व्यक्तीचा करंट लागुन मृत्यू होवू शकतो? याला जबाबदार कोण ? सदर शेतकरी विजय गुजरकर यांनी राळेगाव महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना फोन द्वारे माहिती दिली तर त्यांनी असे उत्तर दिले की मी लाईन मन लोकांना सांगितले आहे. ते रोहित्र ठिक करून देतील. पण माझी गाय करंट लागुन मरण पावली आहे त्यांचे काय असे विचारले असता तेव्हा त्यांनी मला असे सांगितले की तुझी गाय करंट लागुन मृत्यू झाली आहे पण तुला तुझ्या गाईचे पैसे मिळायला १० ते १२ वर्षं लागु शकतो असे सांगून वेळ मारुन नेली असल्याचे शेतकरी विजय गुजरकर यांनी सांगितले आहे.
