काहो साहेब याची जवाबदारी कोणाची? कडेला वाढलेल्या काटेरी झुडूपांच थेट रस्त्यावर अतिक्रमण?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

सध्या कोणी चं वाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट बी ला नाही, पथदिवे बंद, अपघातास कारणीभूत ठरणारी काटेरी झुडूपांच थेट रस्त्यावर अतिक्रमण, ठिकठिकाणी गट्टू उखडले गेले, मधोमध असलेले लोखंडी दुभाजक अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत,तर चार मोठे पथदिवे खांब वाकले तर दोन ठिकाणी खांब गायब झाले आहे पण ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर आहे?
ते मात्र कळत नाही.सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते, संबंधित अधिकारी व कर्मचारी दररोज याच मार्गाने येजा करतात पण त्यांना देखील याचं सोयरसुतक नाही असं च म्हणावं लागेल.
कळंब -राळेगांव वडकी या राष्ट्रीय -महामार्ग क्रमांक 361 बी वरील सध्या रोडच्या दोन्ही कडेला काटेरी झुडपे हे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रोडवर आले असून राळेगाव आय.टी.आय पासून चौहान पेट्रोल पंप ते वर्धा बायपास, ते थेट वडकी पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते परंतु वाहन चालवितांना, साईट देताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मोठ्या काटेरी झुडपामुळे ये जा करणाऱ्या पायी चालत असणारे नागरिकांना खूप मोठा प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसात या काटेरी झुडूपां मुळे अपघातात आपले प्राण सुद्धा गमवावे लागले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झाडांनी मोठा घेराव घातला की अतिक्रमण केले असून चौहान पेट्रोल पंप ते वर्धा बायपास, ते वडकी पर्यंत डिव्हायडर वर सुद्धा मध्यभागी मोठमोठे काटेरी झाडांचे कुंपण आपोआप झाल्या चं दिसून येत आहे ही बाब सर्वसाधारण जनतेच्या निदर्शनात येत असून संबंधित विभाग हा जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेऊन असल्याचे चित्र सध्या राळेगाव शहरात व तालुक्यात बघायला मिळत आहे हे काटेरी झुडपे ताबडतोब तोडण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, याच राष्ट्रीय मार्गावर पुन्हा अपघाताची वाट तर बघत नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे परंतु संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे झालेले काटेरी झुडपे हे ताबडतोब नष्ट करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.