हिमायतनगर शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च संपन्न

हिमायतनगर. तालुका प्रतिनिधी/ प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर शहरात येणाऱ्या काही दिवसात होत असलेल्या रामनवमी व रमजान ईद या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी हिमायतनगर पोलीस प्रशासनाकडून शहरात शांतता काय ठेवण्यासाठी दि 28 मार्च रोजी रूट मार्च काढून शहरातील जनतेला व नागरीकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की राम नवमी व रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक व भोकर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 28 मार्च रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांचे उपस्थितीत आज शहरातील मुख्य मिरवणूक रस्त्याने रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना धार्मिक सण व उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांनी शांततेत सण साजरे करण्याचे आव्हान शहरातील नागरिकांना केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन,सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.