
प्रतिनिधी :प्रवीण जोशी/ढाणकी
ढाणकी पासून जवळच असलेल्या टेंभुरदरा गावातील दिलीप जाधव या विद्यार्थ्याने मराठी विषयात एम ए मराठी ही पदवी प्राप्त करून घवघवीत यश मिळवले आहे. हल्ली आपण बघतोच आहे तरुणांचा जास्तीत जास्त ओढा हा विज्ञान शाखेकडे आहे पण दिलीप ने मात्र आपल्या मातृभाषेवर विश्वास ठेवून व तीच सर्वश्रेष्ठ मानत हे यश प्राप्त केले विशेष म्हणजे कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमीचा विचार केला असता किमान एवढा शैक्षणिक कित्ता कोणीच गिरवला नाही. त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असून उमरखेड येथील गो सी गावंडे महाविद्यालयातून हे यश त्याने प्राप्त केले. तर संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती आहे .तो यशाचे श्रेय आई-वडिलांना व आप्तेष्टांना देतो.
