आंतरराज्यीय जानवर तस्करीचा पर्दाफाश,वडकी पोलिसांची कारवाई ४४ दुधाळ म्हशीसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

नागपूर येथून वडकीमार्गे अदिलाबाद येथे गोवंश घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी बोरी ईचोड गावाजवळ अडविला. यावेळी पोलिसांनी ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे आंतरराज्यीय जानवर तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बोरी ईचोड गावाजवळ करण्यात आली.

वडकी पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून गोवंश तस्करी करण्यात येते. छत्तीसगड, नागपूरमधून तेलंगणा व आंध्र प्रदेशात जनावरांची निर्दयपणे वाहतूक करण्यात येत आहे. दरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांना गोवंशाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. यामाहितीच्या आधारे त्यांनी कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बोरी ईचोड गावाजवळ सापळा रचला. त्या दरम्यान पी.बी.१३बी.पी.६६८८ क्रमांकाचा कंटेनर येतानी दिसला. सदर कंटेनर पोलिसांनी अडविला व पाहणी केली असता कंटेनरमध्ये ४४ म्हशी व त्यांचे बछडे निर्दयपणे कोंबून, चारा, पाण्याची व्यवस्था न करता आढळून आले. यात ४५ दुधाळ म्हाशिसह बछडे, एक कंटेनर असा एकूण ४४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून म्हशींना वणी येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले . तर कंटेनर चालकासह चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर वडकी पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाही वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांच्या नेतृत्वात शिपाई उद्धव घुगे, विलास जाधव, शंकर जुमनाके, अरविंद चव्हाण, विजय बशेशंकर, चालक गजानन अडपावार आदींनी केली.