तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत गाडगे महाराज विद्यालयाने पटकाविला तृतीय पुरस्कार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

अंतरगाव-शनिवार दिनांक 20जानेवारी ला तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव येथील विद्यार्थी चमुने पटकावले.
स्वर्गीय शशी शेखर भाऊ कोल्हे स्मृती प्रित्यर्थ लखाजी महाराज विद्यालय झाडगाव येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील गटात गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव ची चमु सहभागी झाली होती.यासाठी गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव चे शिक्षक संदीप सुरपाम, नितीन एंबडवार, राजकुमार तागडे, धंम्मानंद तागडे हे प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित होते व विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देत होते त्यामुळे ५००० रुपये रोख, स्मृती कप जिंकण्यात टीम यशस्वी झाली.सर्व भाग घेणाऱ्या खेळाडू चे व सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे प्राचार्य राजेश शर्मा यांनी अभिनंदन केले आहे.