वसंतराव नाईक कृषी विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे 23 शालेय विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप

बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान

वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप करण्यात आले.सर्व प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर व संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी स्व.ल.ह.एडतकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंजाराम संभाजी डोंगे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून बी.जी.राठोड माजी शिक्षण सभापती यवतमाळ तसेच संस्थापक,अनिल चेंडकाळे संस्थेचे कार्यवाहक व पत्रकार संघाचे अध्यक्ष, माजी प्राचार्य जी.पी.भगत, प्राचार्य डि.एम.खर्चे, भिमराव बल्लाळ, मिलिंद कांबळे, हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी ज्या गावात बसची सोय नाही त्या विद्यार्थिनींना सायकलचे वितरण बी.जी.राठोड माजी शिक्षण सभापती यवतमाळ व संस्थापक तसेच अनिल चेंडकाळे संस्थेचे कार्यवाहक व पत्रकार संघाचे अध्यक्ष पुसद
यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बी.जी.राठोड यांनी विद्यार्थिनींना सायकल चाबी देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप ही योजना चांगली असून यामुळे मुलींच्या शिक्षणातील संख्या वाढत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बाहेर शहराच्या
ठिकाणी जाऊन उच्च शिक्षण घेता येत आहे. सायकल वितरण करतांना सर्व 23 विद्यार्थिनींना उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राध्यापक संतोष आंडगे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल माने यांनी केले तर आभार प्रदर्शन कु पुजा मस्के यांनी मानले.या वेळी विद्यार्थी पालक व प्राध्यापक,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.