मत्स्यव्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना देवळी येथे आठवडी बाजारात नियोजित जागेचे आखणी करण्याची मागणी….

देवळी शहरात शुक्रवार आठवडी बाजारात १५० मत्स्यव्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना नियोजित जागेची नव्याने आखणी करण्याची मागणी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन…..!!

सहसंपादक -रामभाऊ भोयर

देवळी शहरात नगर परिषद अंतर्गत येणारा शुक्रवार आठवडी बाजार येथे नवीन मटन मार्केट च्या बाजूला मत्स्यव्यवसाय करण्यासाठी नियोजित जागेची आखणी करून दिलेली होती‌. परंतु सद्यस्थितीत त्या ठिकाणी मासे विर्केत्या व्यतिरिक्त चिकन विर्केते यांनी सुध्दा दुकाने लावल्याने मासे विर्केते यांना आपला व्यवसाय करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे‌. त्यामुळे सर्व मत्स्यव्यवसाय कडून‌ मागणी करण्यात आली कि, मटन दुकानाची स्वतंत्र ओळ व चिकन दुकानाची स्वतंत्र ओळ आणि मासे दुकानाची स्वतंत्र ओळ अश्या तीन हि दुकानाच्या स्वतंत्र ओळी पुन्हा नव्याने आखून द्याव्या जेणे करून मत्स्य व्यवसाय यांना आपली स्वत:ची जागा मिळेल व त्याठिकाणी तो आपला व्यवसाय करू शकेल आणि मटन विर्केते किंवा चिकन विर्केते किंवा मासे विर्केते एकमेकांच्या जागेत हस्तक्षेप करणार नाही.
प्रत्येकाला व्यवसाय करायला पोट आहे मटन विर्केते यांनी मटन विर्केते लाईन मध्ये बसावे व चिकन विर्केते यांनी चिकन लाईन मध्ये बसावे आणि मासे विर्केते यांनी मासे विर्केते लाईन मध्ये बसावे येथे जातीपातीचा विषय येतं नाही १५० मासे विर्केते आहेत तर कोणी आमचा असेल तर चिकनची दुकान असेल तर त्यांनी चिकनच्या लाईन मध्ये बसावे असे मत महर्षी वाल्मिकी ऋषी भोई समाजसेवी संस्था चे सचिव किरण पारीसे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी मिलिद साटोंने यांना निवेदन देतांनी सांगण्यात आले.
निवेदन देतांना महर्षी वाल्मिकी ऋषी भोई समाजसेवी संस्था चे सचिव किरण पारीसे, कार्याध्यक्ष विजय पचारे, पत्रकार रविंद्र पारीसे, शंकर पारीसे, मारोती मांढरे, दिलीप नान्हे, दिनेश पारीसे, ज्ञानेश्वर पारीसे, मधुकर पारीसे, राजू डायरे, नरेश पारीसे, आशिष डायरे, महादेव डायरे, आकाश मांढरे, गणपत पचारे व भोई बांधव आणि मासे व्यवसाय मोठ्या संख्येने उपस्थिती होते.