
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महागाईचा आगडोंब उतरता उतरेना झाला परिणामी जीव कासावीस होत आहे पोटात भुकेचा गोळा उठत असताना उन्हाचा पारा सहन होत नाही लेकरा बाळासाठी पदरात दोन पैसे पडतील या आशेने उन्हातान्हात रिक्षा घेऊन हाताला कधी काम मिळेल व दोन पैसे कधी पदरात पडतील याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये कोरोना महामारीत दोन वर्ष गेली त्यावेळचे हाल तर सांगणे कठीणच झाली होती रिक्षा बाजारात आणणे त्यादरम्यान कठीण होते ते दिवस तर अर्धपोटी रात्र काढण्यातच गेले तेव्हापासून आमच्या नशिबी उपासमारत आली आहे कोरोना संपला तरी हाताला काम पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाही दिवस दिवस बाजारात बसावे लागते आहे सध्या स्थितीत उन्हाचा पारा सहन होत नाही दुसरीकडे हाताला कामही मिळत नाही मोठी माणसे उपाशी पोटी राहू शकतात पण लहान मुली उपाशी पोटी राहू शकत नाही अशावेळी त्यांच्याकडे पाहून जीव कासावीस होतो. अशावेळी तर लेकरांना खिचडी करून खाऊ घालावी लागते कोरोना आधी दोनशे तीनशे रुपये पदरात पडायचे आता तर कोरोना संपलाय सर्व बाजारपेठ खुली झाली आहे मात्र या सरकारच्या काळात झालेली नोटबंदी, तसेच अनेक नियम व अटी सरकारने लावली तसेच भरमसाठ भाववाढ या मुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे त्यामळे बाजारपेठेत सन्नाटा दिसतो आहे पाहिजे त्यामुळे आजही आमच्या नशिबी उपासमारच आहे.
एकीकडे पोटात भुकेचा गोळा उठत आहे तर दुसरीकडे प्रखर उन्हाचा पारा डोक्यावर घ्यावा लागत आहे.त्यामुळे दिवसभरात पदरात दोनशे रुपयेही पडेनासे झाले आहे मग कुटुंबातील सदस्यांना काय खाऊ घालावे हेच कळेना झाले आहे मात्र याकडे शासनाचे आमच्या गरिबांकडे लक्ष देईनासे झाले आहे.
शासनाने आर्थिक मदत द्यावी
कोरोना काळात दोन वर्षे उपाशीपोटी गेले आहे आता काम मिळेल असे वाटले होते परंतु सध्या स्थितीत काम मिळणे कठीण झाले आहे .कुटुंबातला मोठे चार पाच सदस्य आहेत दिवसातून शंभर रुपये पदरात पडत आहे महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही महागाईमुळे किराणा दुकानावर जावे वाटत नाही भाजीपाला तर आमच्या नशिबातच नाही चटणी भाकर खाऊन दिवस काढायला लागत आहे
