
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सराटी हे गाव मोहदा ते सावरखेडा रोडवर असून त्यांचा बाजार त्यांचे सर्व व्यवहार मोहदा येथून चालतो.सोबतच मंगळवारी मोहदा बाजार सुद्धा सराटी येथील गावकऱ्यांना पडतो.या गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्व सण आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करतात अशातच या गावाला कुणाची दृष्ट लागली म्हणावं की काय माहित नाही. या गावात एवढ्यात काही गावातील काही विकृत स्वरूपाच्या लोकांनी एक शेतकऱ्यांना भयग्रस्त करण्याचा आणि आर्थिक हाणी पोहचविण्याचा उपक्रम सुरू केला असून मंगळवारी सायंकाळी बाजार करून रात्री उशिरा येताना कुणाच्या तरी शेतातील कपाशीचे झाडं उपडून ठेवण्याचा विकृतपणा सुरू केला असून मागील काही महिन्यांपूर्वी शेतातील बैलांच्या गोठ्याला आग लावली होती त्यात सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.त्यानंतर कपाशीची लागवड केलेली झाडे सुद्धा उपडून ठेवली होती. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती परत करण्यात आली असून परत सराटी याच गावातील नामदेव लांडगे यांच्या शेतातील कपाशीचे पीक उपडून ठेवण्याचा पराक्रम या विकृतांनी केला असून शेतकरी अगोदरच अनेक प्रकारे अडचणीचा सामना करत असताना हे अजून तयार झालेल्या मानवी संकटामुळे त्या गावातील शेतकऱ्यांची झोप उडाली असून या बाबतीत राळेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून या बाबतीत सविस्तर चौकशी करून आरोपीचा शोध लावून शेतकऱ्यांना भयमुक्त करावे अशी विनंती सराटी येथील शेतकरी नामदेव लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
