अतिवृष्टीची मदत अत्यल्प, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ,फेर तपासणी करून वाढीव मदत दया, मनसेची निवेदनाद्वारे मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक महसुल प्रशासनामार्फत बँकेत जमा झाली.मात्र अत्यल्प मदत मिळाल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. या बाबत फेर सर्वे करून वाढीव मदत देण्याची मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली. मनसे जिल्हा उपाध्यक्ष शँकर वरघट यांचे नेतृत्वात तहसीलदार राळेगाव यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
याद्या लागून बँक मध्ये रक्कम जमा झाली. १३,६०० रू हेक्टरी मदतीच्या नावाने असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र हेक्टरी ५ हजार, काही शेतकऱ्यांच्या ४ हजार अशा पद्धतीने रक्कम जमा होत आहे. कोण्या गावाची आणेवारी ९० टक्के कोण्या गावाची ७० टक्के तर कोण्या गावाची ४० टक्के तलाठ्याच्या मनात येईल तशी टाकण्यात आली आहे.
किन्ही/विरगाव परिसरामध्ये तर तलाठ्याने तर ४० टक्के ५० टक्के आणेवारी टाकल्याने किन्ही /विरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या ऐन दिवाळीच्या तोंडावर तोंडाला पाणे पुसले गेली आहे त्यामुळे तत्काळ राळेगाव तालुक्याला विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची सरसकट आर्थिक मदत मिळवुन द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी हितासाठी जनआंदोलन छेडण्यात येईल
यावेळी मनसे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, मनसे तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे,
पांडुरंग भेदूरकर, उपसरपंच अरुण खंगारे, अक्षय आडे, करन नेहारे, गुणवंता आडे, सचिन शेंडे, राजू गुळघाणे, भारत ऊईके, महेश येलेकर ,अमर येलेकर, बंटी गवारकर, विनोद पोटे, परिसरातील शेतकरी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.