

पण पाण्याची ठराविक जागा असताना ग्राहक पाण्याविना स्टेट बँकेचे दुर्लक्ष
ढाणकी
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
कृत्रिम अच्छादन नसल्यामुळे ग्राहकासोबत हेळसांड होत असताना त्या संबंधात वृत्त प्रकाशित होताच या आधी कधी न पाझर फूटणारी यंत्रणा जागृत होऊन ग्राहकांना आसरा उभारून माणुसकीचे थोडेफार दर्शन घडवले व टोनप्याला पाने फुटले म्हणायला हरकत नाही. तसेच आम्ही हे करणारच होतो थोडा उशीर झाला साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं असे साहेबांच्या सप्तसुरात सुरू मिसळणारे सांगत असल्याची चर्चा होती. गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असताना आच्छादन करून ग्राहकाला दिलासा दयायला पाहिजे होता बातमी प्रकाशित केल्यामुळे आच्छादन केले नाही तर आम्ही ते करणारच होतो असे चर्चा करणाऱ्यांना नेमके काय सुचवायचे होते. सूरात सूर मिसळणाऱ्यांनी ही व्यवस्था आधी केली गेली असती तर ग्राहकांची त्रेधातिरपीट झाली नसती.आज रोजी आठवड्यातील पहिला दिवस सोमवार असल्यामुळे ढाणकी येथील बाजार असतो. खेडेगावातील नागरिक बाजार व बँकेचे काम असे दोन्ही काम होईल या दृष्टीने येतात त्यामुळे साहजिकच सर्व ठिकाणी गर्दी असते. स्टेट बँकेतील शेतकरी कर्जाची प्रकरणे इकेवायसी या बाबीसाठी येत असतात त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र कुठेही नाही. एसएमएस, एटीएम, अशा साध्या बाबीसाठी चार्जेस च्या नावाखाली ग्राहकाकडून वसुली होत असताना तिथे पाणी पिण्यास मात्र मिळत नाही शाखा प्रबंधक मानव धर्म विसरले की काय असा प्रश्न आता बाहेर गावावरून आलेल्या ग्राहकांना पडतो आहे. काही दिवसापूर्वी येथे पाणी व्यवस्था होती तशी ती जागा सुद्धा साक्ष देते पण आतापर्यंत तिथे पाणीपोई का सुरू केली नाही न कळणारे रहस्य आहे. साहेब करतील ते कायदा अशी परिस्थिती सध्या भारतीय स्टेट बँक शाखा ढाणकीची बनलेली आहे. अनेक संघटनांनी विविध पक्षांनी एटीएम बाहेर बसवण्यासंदर्भात निवेदन देऊन सुद्धा एटीएम हे बँकेच्या आताच असते सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना रक्कम काढायचे असल्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. वर्षाचे चार्जेस घेताना पूर्णच रक्कम ग्राहकाकडून वसूल केल्या जाते मग सेवा देताना काचकूच का करावी .
